प्रत्येक फायब्रॉइडचं ऑपरेशन गरजेचं आहे का?
नाही. अनेक महिलांना फायब्रॉइड असतो आणि त्यांना कळतही नाही. रूटीन सोनोग्राफीत सापडलेला, कोणताही त्रास न देणारा फायब्रॉइड बहुतेक वेळा फक्त लक्ष ठेवून पाहिला जातो.
उपचार तेव्हा गरजेचा असतो जेव्हा फायब्रॉइडमुळे:
- पाळी जास्त किंवा जास्त दिवस येते, विशेषतः हिमोग्लोबिन कमी असेल तर
- लघवीच्या पिशवीवर किंवा आतड्यावर दाब येतो
- ओटीपोटात दुखतं किंवा सूज येते
- गर्भधारणेत अडचण येते, फायब्रॉइडच्या जागेनुसार
गर्भाशय वाचवायचं असेल तर लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक मायोमेक्टॉमीमध्ये फक्त फायब्रॉइड काढले जातात, मोठे किंवा अवघड जागेवरचे सुद्धा.
पहिल्या भेटीला तुमची अलीकडची सोनोग्राफी आणि हिमोग्लोबिन रिपोर्ट घेऊन या. OPD: लव्ह युअर बेली क्लिनिक, बाणेर, सोमवार ते शनिवार, सकाळी 9 ते रात्री 9. कॉल किंवा WhatsApp करा 87 9722 9722.
Read more about fibroid removal: Robotic Myomectomy in Pune and Laparoscopic Myomectomy in Pune.

.png)